ABP Majha Headlines : 06:30 AM : 25 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज ६व्या टप्प्यात मतदान... 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ जागांवर मतदार बजावतायेत हक्क

पुणे अपघातप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित..वेळेत अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

विशाल अगरवालसह सहाही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींचा जामीनासाठी अर्ज

श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच, पुणे अपघात प्रकरणावरुन पालकमंत्री अजित पवारांचा इशारा

डोंबिवलीतल्या स्फोटप्रकरणी अमुदान कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक, आरोपी मालती मेहता आणि आरोपी मलय मेहताला अटक, स्फोटात ८ जणांचा मृत्यू

राज्यात नागपूर, परभणी, मेळघाटात अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयाण चित्र..अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर

गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत आठ नक्षलींना कंठस्नान.. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई

राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करत सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनंतर फायनलमध्ये, रविवारी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये रंगणार महामुकाबला.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-06-30-am-25-may-2024-maharashtra-news-lok-sabha-elections-2024-1284749
0 Comments