बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार

पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात...राज्यात ५४.२९ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान...

राज्यात कल्याणमध्ये सर्वात कमी ४१.७ टक्के मतदानाची नोंद...तर दिंडोरीत सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान

निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप...पराभवाच्या भीतीने मोदी सरकार पछाडल्याची ठाकरेंची टीका...तर आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडून तक्रार

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाई करा, गृहमंत्री फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश..तर भरधाव वेगात कार चालवतानाचा नवा सीसीटीव्ही समोर

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तळकोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

आज बारावीचा निकाल

Maharashtra Board HSC Result : पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येईल. यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-6-30-am-21-may-2024-maharashtra-news-lok-sabha-election-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1283640
0 Comments