छत्रपती संभाजीनगर: राज्यातील भीषण पाणीटंचाईचा (Water Scarcity) फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुक्या जनावरांनाही बसतोय . छत्रपती संभाजी नगरमध्ये चाऱ्याअभावी गोशाळा कशा चालवायच्या, हा प्रश्न गोशाळा चालकांना पडलाय. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातील दागिने गहाण (Gold Loan) ठेवून चारा खरेदी केला आहे. आता त्यांच्याकडे केवळ दोन दिवसच पुरेल एवढा चारा (Fodder) शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी गोशाळाला चारा देण्याचं आवाहन केलंय.

खपाटीला गेलेली मुक्या जरांवरांची पोटं, चारा नसलेली दावणी अन् चाऱ्यासाठी वाट पाहणाऱ्या जनावरांचा हंबरडा, हे चित्र आहे मराठवाड्यातील संभाजीनगरच्या पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळेतीळ.... दुष्काळाचा फटका जसा माणसांना बसतोय तसाच या मुक्या जनावरांना देखील बसतोय.त्यांना ही दुष्काळाचा सामना करावा लागतोय. डोळ्यासमोर आलेल्या दावणीत एकावेळी मिळालेलं चारा पुन्हा कधी मिळेल याची वाट या जनावरांना पहावे लागतेय...लेकरांप्रमाणे पालन पोषण करून जगावलेल्या या मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी परमेश्वर नलावडे प्रचंड धरपड करतायत... एवढंच काय तर त्यांनी घरातील सुनेचं सोनं गहाण ठेवून जनावरांसाठी चारा विकत आणला आहे.

चाऱ्यासाठी हंबरडा फोडणारी मुके जनावरे पाहून अंगावरील सोनं जणू जड वाटत होतं, त्यामुळे ते सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला असे नलावडे यांच्या सूनबाई अश्विनी यांनी सांगितले. हे विदारक चित्र पाहून तरी आता शेतकरी आणि गोशाला चालकांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावर काही निर्णायक कृती केली जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुक्या जनावरांच्या हाल होत आहेत त्याला सरकारला जबाबदार धरले सरकार गोशाळा चालकांना अनुदान देत नाही एकीकडे गाईवर प्रेम दाखवते पण त्यांच्या चाऱ्या विषयी गंभीरता दाखवत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नलावडे यांनी सुनेचे सात तोळे दागिने गहाण ठेवले

नलावडे यांच्याकडे आता दोन दिवस पुरेल एवढाच चारा उरला आहे. स्वतः जवळ असलेला सर्व पैसा त्यांनी चारा खरेदीसाठी वापरला. वेळप्रसंगी घरातील महिलांचे दागिने गहाण ठेवले.. मात्र आता पुढील दिवस कसे काढायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची मूठभर चाऱ्याची. नलावडे यांनी चारा देण्यासाठी आवाहन केल्यानंतर आता त्यांच्या मदतीसाठी किती हात पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गोशाळेतील चाऱ्यासाठी परमेश्वर नलावडे यांनी दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे पुरावे समोर आले आहेत. नलावडे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियातून 3,52,214 रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्ज फेडण्यासाठी एका वर्षाची मुदत आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी नलावडे यांनी सूनेचा सोन्याचा नेकलेस, कानातील रिंगा आणि काही दागिने गहाण ठेवले आहेत.

आणखी वाचा

राज्याला पाणीटंचाईच्या संकटाने घेरले; मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई

source https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/chhatrapati-sambhaji-nagar-water-scarcity-drought-no-fodder-for-cattle-goshala-owner-takes-loan-keeping-daughter-in-law-gold-jewellery-mortgage-1286310
0 Comments