मुंबई : राज्यासह देशात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 23, 2024
विदर्भात पावसाचा जोर कायम
गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा (Heat) दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/HUBTXfKzym
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 23, 2024
अद्यापही अवकाळी पावसाचा अंदाज कायम
महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा अवकाळी पाऊस राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे. याशिवाय आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यात देखील मोठा व्यत्यय येत आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-forecast-imd-rain-prediction-heatwave-kokan-vidarbh-marathwada-maharashtra-marathi-news-1284475
0 Comments