विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू... तब्बल ७९ दिवसांनंतर विठुरायाचा चरण स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रीक होणार, एनडीएला ३५३ ते ३८३ च्या दरम्यान जागा मिळणार, एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...

भाजपला ३१५ जागा मिळणार, काँग्रेसला ७४ जागा मिळण्याची शक्यता...एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच...महायुतीला २४ तर मविआला २३ जागा...एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज...

एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक १७ जागा...पण दोन पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही...ठाकरेंच्या शिवसेनेला ९, तर शिंदे गटाला ६ जागा मिळणार...

कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश...काँग्रेसलाही फायदा...पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज...

इंडिया आघाडी देशात २९५हून अधिक जागा जिंकेल, इंडियाच्या बैठकीनंतर खरगेंनी व्यक्त केला विश्वास

अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार.. कोर्ट अंतरिम जामीनावर ५ जूनला निकाल देणार..

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-06-30-am-02-june-2024-maharashtra-news-lok-sabha-elections-exit-polls-1286870
0 Comments