ABP Majha Headlines : 07 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा ३५१वं वर्ष..रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन

नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला एक मंत्रीपद, शिंदेंच्या वाटेला एक राज्यमंत्री, एक मंत्रीपद येण्याची शक्यता.

इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, इंडिया आघाडी वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीचं निमंत्रण.

लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार दिल्लीला रवाना होणार

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक झालेल्या प्रज्वल रेवण्णाची कोठडी संपली, आज कोर्टात हजर करणार,

राहुल गांधी वायनाड सोडणार की रायबरेली याची उत्सुकता, दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधींचा विजय, प्रियांका गांधींकडूनही राहुल गांधींचं कौतुक

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-07-am-06-june-2024-maharashtra-news-shiv-rajyabhishek-sohala-pm-modi-oath-devendra-fadnavis-1288454

Post a Comment

0 Comments