ABP Majha Headlines : 6:30 AM : 21 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मिरमध्ये योगदिन साजरा करणार, श्रीनगरच्या दल लेकजवळ ७ हजार लोकांसोबत करणार योगासनं .
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक.... विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा...
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार.
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार.
३४ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम, शुटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवानच्या बंगल्यात
विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला १०० जागा द्या, महायुतीत जागावाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं, रामदास कदमांनी भाजपला सुनावलं, ठाकरेंच्या २१ जागांवरही बोट
अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी....तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्लाबोल...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-21-june-2024-6-30-am-maharashtra-news-1292136
0 Comments