मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी (Monsoon) पाहायला मिळतील. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन-तीन दिवस पावसाने चांगलं झोडपल्यानंतर आज थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज
दक्षिण कोकणात आज अनेक ठिकाणी तर आज आणि उद्या कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता
मुंबईत गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आजही मुंबईत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 13, 2024
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/HhFbGcQ वर्षात 6000 कोटी खर्च करुनही मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था, ऐन पावसाळयात वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-rain-news-imd-forecast-rain-forecast-in-mumbai-thane-konkan-what-does-metrological-department-marathi-news-1290489
0 Comments