Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM: 22 June 2024

छगन भुजबळांसह सहा मंत्री आज घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, सगेसोयरेच्या हरकतींबाबत सरकारने काय केलं हे कळावं, लक्ष्मण हाकेंची मागणी
खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, भुजबळांची माहिती तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, जरांगेंचा इशारा
लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या... मात्र मविआमधील एकीसाठी २ पाऊलं मागे घेतली... पुण्यातील बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
अटल सेतूवरच्या काँक्रीटला सहा महिन्यांतच भेगा, भ्रष्टाचार झाल्याचा नाना पटोलेंचा आरोप...तर कोणत्याही भेगा नाहीत, काँग्रेसचे आरोप खोटे, फडणवीसांचं उत्तर...
मुंबई उत्तर पश्चिममधून रविंद्र वायकरांच्या विजयाला अखेर हायकोर्टात आव्हान...उमेदवार भरत शाह यांची उच्च न्यायालयात याचिका...
मुंबई मेट्रो तीनची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु, प्रवाशांऐवजी अवजड गोष्टी ठेवून मेट्रोची चाचणी, अॅक्वालाईन मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-maharashtra-news-update-6-30-am-22-june-2024-abp-majha-marathi-news-1292377
0 Comments