विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच पक्षांची खबरदारी...भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार...

सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर...कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी...

विरोधकांकडे निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ, पण मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही...बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल...

विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र, राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार

वरळी हिट अँड रन प्रकरणातला फरार मुख्य आरोपी मिहीर शाहला अखेर विरारमधून अटक...आई आणि दोन बहिणींसह १२ जण शहापूरमधून ताब्यात.

६० तास फरार असलेला मिहीर १५ मिनिटं फोन ऑन झाल्यानं फोनमुळे सापडला...सोबत असलेल्या मित्रानं फोन सुरू केल्यानं पोलिसांना लोकेशन समजलं...एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-630am-10-july-2024-marathi-news-1296922
0 Comments