जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून संपूर्ण राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत, असे जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले वेगवेगळे राजकीय नेते त्यांची भेट घेोत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली आहे.

लोक महाविकास आघाडी, महायुतीला आता कंटालळे

या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोक महाविकास आघाडी, महायुतीला आता कंटालळे आहेत. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. राज्यातील गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात नवं समीकरण घडवून आणत आहोत. आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत, अशी माहिती जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी दिली.

...अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत.

"महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत. त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. महायुती हटवली तर महाविकास आघडी येते. महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत," असं राजरत्न आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राजरत्न आंबेडकर यांनी स्थापन केला नवा पक्ष

राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच राज्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरपीआय नावाने नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे आता ते राजकीय समीकरण जुळवू पाहतायत. तर राजकारण माझा प्रदेश नाही. पण राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यामुळे आम्हाला राजकारणात उतरावे लागत आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

फटका नेमका कोणाला बसणार?

दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांच्या भेटीपूर्वी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार? मनोज जरांगे कोणाशी हातमिळवणी करणार? जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केल्यास त्याचा फटका कोणाला बसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/NoWXxUD Nimbalkar on Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना दिलेलं वचन पूर्ण करावं : ओमराजे निंबाळकर

<a href="https://ift.tt/ugHszYx Raje Chhatrapati and Manoj Jarange : मोठी बातमी : संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभेला एकत्र लढण्याच्या हालचाली

source https://marathi.abplive.com/news/politics/maratha-reservation-activist-manoj-jarange-patil-and-rajratna-ambedkar-meeting-jalna-ahead-of-vidhan-sabha-election-1305918
0 Comments