Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा सविस्तर अंदाज.

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये उकाडा

जुलै अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. पाऊस ओसरल्यानं पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान (Maharashtra Weather Update) विभागाने व्यक्त केला आहे. शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील. या काळात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही भागात पाऊस होईल, तर काही भागात कोरडे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत. तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत देखील आले आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

राज्यात सरासरीपेक्षा 29 टक्के अधिक पाऊस, 15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-intensity-of-rain-will-increase-in-the-state-from-today-rain-update-news-1306426
0 Comments