Supriya Sule and Yugendra Pawar Baramati news : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

बारामतीतील गुणवडी चौकात लागले बॅनर

बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/vDeYsgd Vidhan Sabha: अजितदादांकडून स्पष्ट संकेत; बारामती विधानसभेत आता जय पवार Vs युगेंद्र पवारांची लढाई रंगणार?

source https://marathi.abplive.com/news/politics/banners-were-put-up-in-baramati-that-supriya-sule-was-the-chief-minister-andyugendra-pawar-was-the-mla-1314333
0 Comments