Maharashtra News Live Updates 24 Sep 2024: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा पूर्ण, मृतदेह आता जे जे रुग्णालयात नेला जाणार

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरकीडे 23 सप्टेंबर रोजी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत.&nbsp;&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-24th-september-2024-badlapur-crime-news-akshay-shinde-encounter-marathi-news-vidhan-sabha-election-sharad-pawar-ajit-pawar-eknath-shinde-devendra-fadnavis-uddhav-thackeray-1314840

Post a Comment

0 Comments