Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क 

<p style="text-align: left;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदानकेंद्रे उभारण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या (Vidhan Saha Election Voting Today) प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बारामतीत अजित पवार जिंकणार की नवखे युगेंद्र पवार बाजी मारणार, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/elections/maharashtra-assembly-election-2024-live-updates-vidhan-sabha-nivadnuk-voting-matdan-today-20-november-2024-exit-polls-results-eknath-sindhe-uddhav-thackeray-devendra-fadnavis-shiv-sena-bjp-congress-1327574

Post a Comment

0 Comments