भारताचा आज ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर परेड होणार, 'स्वर्णिम भारत: परंपरा आणि विकास' अशी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम.

कर्तव्यपथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन.. तिन्ही सैन्य दलाच्या शिस्तबद्ध कवायतींची उत्सुकता, ३१ चित्ररथांमध्ये साकारणार स्वर्णिम भारताचा गौरव

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई, तिरंग्याची रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी.

सैन्यदलातील ९३ जवानांना शौर्य पुरस्कार, मेजर मनजीत यांना कीर्ति चक्र तर १४ जवानांना शौर्य चक्र, नायक दिलवर खान यांना मरणोत्तर कीर्ति चक्र

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण... शेखर कपूर यांचाही पद्मभूषणने सन्मान... तर सुझुकी मोटार्सचे संस्थापक ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण...

अशोक सराफ, मारुती चित्तमपल्ली, डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार आणि अश्विनी भिडे-देशपांडे यांचा पद्मश्रीनं सन्मान...वासुदेव कामत, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य यांचाही गौरव...महाराष्ट्राच्या रत्नांना १४ पद्म पुरस्कार...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू...मराठा समाजाच्या १० मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी...सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर ठाम...

वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण कोस्टल रोडचं उद्धाटन, मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ १५ मिनिटांत कापणं शक्य

बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना ठाण्यात एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक

उत्तराखंडमध्ये उद्यापासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, मुख्यमंत्री पुष्कर धामी करणार यूसीसी पोर्टलचा शुभारंभ.. धर्माच्या आधारे कसलाही भेदभाव होणार नसल्याची ग्वाही

दुसऱ्या टी२० सामन्यात भारताची इंग्लंडवर २ विकेट्सनी मात, तिलक वर्माच्या शानदार खेळीमुळे विजय, मालिकेत भारत २-० ने आघाडीवर

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-07-am-26-january-2025-republic-day-2025-manoj-jarange-walmik-karad-maharashtra-news-abp-majha-1340733
0 Comments