Majha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP Majha
देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आज काम बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन.
सिंधुदुर्गात सरपंच संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं निषेध आंदोलन, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी संशयित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग, सीआयडीकडून वायभसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी, खंडणी प्रकरणात विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याची फोर्ड कार केज पोलिसांनी घेतली ताब्यात.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट, हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट.
सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो एक्सवर पोस्ट, लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा फोटो पोस्ट.
अंजली दमानियांकडून वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचं स्टेटमेंट शेअर, राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र घनवट,वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव, अजूनही म्हणता संबंध नाही? दमानियांचा सवाल.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-at-6-30am-09-january-2025-superfast-news-marathi-news-beed-santosh-deshmukh-1337590
0 Comments