Maharashtra Weather Update:अकोल्यात 37.8 अंशांची सर्वाधिक तापमानाची नोंद, उर्वरित ठिकाणी हवामान कसे?

Temperature Update: राज्यात उष्णतेच्या झळा प्रचंड तीव्र झाल्या आहेत. विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,18 जानेवारीला अकोल्यात सर्वाधिक तापमानह होते. कमाल तापमानाचा पारा वरचढ झालाय. मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. बहुतांश ठिकाणी 35 अंशांच्या पुढे तापमान नोंदवले गेले असून उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झालेत. (IMD)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्व व पश्चिम विदर्भात पुढील दोन दिवसांनी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात त्यानंतर म्हणजेच 23 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामानाने वर्तवलाय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 3 दिवसांत विदर्भात किमान तापमानात काहीशी घट होणार आहे. (temperature)

हवामान विभागाचा अंदाज काय?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे भारतीय हवामान विभागाने 13 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.चक्राकार वाऱ्यामुळे पश्चिमी चक्रावाताने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात हवामान बदल झाला आहे. 17-18 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथे हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे, तर 19-20 फेब्रुवारी रोजी गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.(IMD)

कुठे कसे होते तापमान?

कमाल तापमान (19 फेब्रुवारी)

शहादा (नंदुरबार) - 40.8°C

बीजीआरएल कराड (सातारा) - 40.5°C

तालेगाव (पुणे) - 38.8°C

टोंडापूर (चंद्रपूर) - 38.9°C

करजत (रायगड) - 39.5°C

इंसा शिवाजी लोणावळा (पुणे) - 39.8°C

अकोला एएमएफयू (अकोला) - 39.7°C

औरंगाबाद - 37.4°C

राजगुरुनगर (पुणे) - 37.4°C

वर्धा - 37.4°C

महाराष्ट्रात कसे राहणार तापमान?

महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पुढील 2-3 दिवसांत कमाल तापमानात 1-2 अंश सेल्सिअस वाढ होईल आणि त्यानंतर मोठा बदल होणार नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात पुढील 24 तासांमध्ये मोठा बदल होणार नाही, परंतु महाराष्ट्राच्या उत्तरी भागात पुढील 3 दिवसांत 2-3 अंश सेल्सिअसने घट होईल. विदर्भात पुढील 5 दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. विदर्भात पुढील 3 दिवस किमान तापमान स्थिर राहील, त्यानंतर तापमानात 2-3अंश सेल्सिअसने घट होईल.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/eI89aD6 Box Office Collection Day 6: 'छावा' सब पर भारी है... सहाव्या दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस; एकूण 180.46 कोटींची कमाई

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-temperature-akola-recorded-highest-37-8-degree-celcius-know-imd-weather-forecast-1345176

Post a Comment

0 Comments