Mumbai Accident: भीषण! भरधाव वेगात दोन दुचाक्यांची जोरदार धडक, वसईत 3 जणांचा जागीच मृत्यू, पंचनामा सुरु

वसई :  वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रात्री  8 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर घडली. दोन मोटर सायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहनांवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident)

राज्यात वेगावर नियंत्रण नसल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढतंच आहे. वसईत मोकळा रस्ता बघून वाहन भरधाव वेगात चालवणं जीवावर बेतलं असून रात्री आठच्या सुमारास वसईतील मधूबन परिसरात शनिवारी (22 फेब्रुवारी) झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. भरधाव वेगात असलेली एक्टिवा गाडी तसेच एक दुचाकी समोर समोर धडकल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये गाडीवर बसलेले तीन जण जागीच ठार झाले . अपघात झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा सुरु असून दूर्घटनेचा पुढील तपास सुरु आहे. (Vasai Accident)

भरधाव वेगात दुचाक्या धडकल्या, 3 मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कूटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मधुबन परिसरातील मुख्य रस्ता मोकळा असल्याने  वाहने वेगाने चालवली जातात, ज्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. आज घडलेली घटना देखील या समस्येचे एक भीषण उदाहरण आहे. अपघाताची माहिती मिळताच वालीव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,  वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. (Mumbai)

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/3FVmLJY: मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा! मध्य- पश्चिम -हार्बर तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉग, कसं आहे वेळापत्रक?

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-accident-two-speeding-bikes-collide-head-on-in-vasai-3-dead-on-the-spot-investigation-underway-1345733

Post a Comment

0 Comments