Gold Price : येणारा काळ हा लग्नसराईचा असतांना सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या किंमतीत एक हजार रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे जीएसटीसह (GST) दर 90 हजार 200 वर जाऊन पोहोचल्याचे सुवर्ण नगरी जळगावात पाहायला मिळाले आहे.

प्रतितोळा सोन्याला मोजावे लागतात 'एवढे' पैसे

डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम आता जागतिक सोन्याच्या बाजारावरही दिसून येत आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर पहिल्यांदाच नव्वद हजारांच्या पार गेले आहेत. या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आज सोन्याचे दर 87, 000 तर जीएसटीसह नव्वद हजार दोनशेवर पोहोचले आहेत. परिणामी सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्नसराईत ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.व्यापाऱ्यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प सरकारने टेरीफ रेट सातत्याने वाढविल्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर 95 हजारांच्या पार जाण्याची शक्यता आहे. या वर्षाखेरीस सोन्याचे दर 90 हजाराच्या पार जातील असा अंदाज होता. मात्र अवघ्या तिसऱ्याच महिन्यात सोन्याने हा उच्चांक गाठला आहे.

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?

फायनान्शियल एक्स्प्रेसनुसार, नागपुरात काल (13 मार्च) 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,741 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वाराणसीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,768 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. लखनौमध्ये काल (13 मार्च) 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,768 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,732 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,741 रुपये आणि 86,990 रुपये आहे.

जाणून घ्या काय आहे चांदीची स्थिती

चांदीच्या वायदा किमतींची सुरुवातही तेजीची होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा बेंचमार्क करार काल वाढीसह उघडला. काल (13 मार्च 2025) रोजी चांदीचा दर 992.9 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतीय शहरांमध्ये चांदीची किंमत खालीलप्रमाणे आहे.दिल्लीत प्रति 10 ग्रॅम चांदीची किंमत 991.2 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 995.8 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता बद्दल बोलायचे झाले तर ते 991.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते 992.4 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, लखनऊमध्ये ते 993.2 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि जयपूरमध्ये ते 992.8 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/4KDkwco Stocks : आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, सलग पाचव्या दिवशी जोरदार घसरण, गुंतवणूकदारांचे 8.4 लाख कोटी बुडाले

source https://marathi.abplive.com/business/gold-silver-price-news-gold-gold-prices-have-increased-by-rs-1000-in-the-last-24-hours-in-price-of-gold-in-jalgaon-maharashtra-marathi-news-1349137
0 Comments