Mumbai Crime News : प्रियकरावर दुसऱ्या मुलीने काळी जादू केली असून त्यामुळे तो कॉल उचलत नाही, तुला नियमीत भेटण्याचे टाळतो, असे सांगून सांताक्रूझ येथील 32 वर्षीय महिलेला एका तांत्रिकाने फसवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इंस्टाग्रामवर भेटलेल्या या तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या प्रियकराच्या डोक्यावर जादूटोणा केल्याचा दावा करत तिला विविध विधींसाठी 3.47 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

ज्योतिष्याची इंस्टाग्राम पोस्ट पाहिली, अन्....

पुढे आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ऑक्टोबर 2024 मध्ये तिच्या प्रियकराला भेटली होती. तिचा प्रियकर मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या तो ठाण्यात राहतो. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा प्रियकर तिच्यासोबत असताना येणारे दूरध्वनी उचलत नव्हता. त्यामुळे त्याचे दुसऱ्या मुलीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा तक्रारदार महिलेला संशय आहे. त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. यातून कसे बाहेर पडता येईल, याबद्दल विचार करत होती. अशातच तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट पाहिली. त्यानंतर जानेवारीमध्ये तिने एका ज्योतिष्याची इंस्टाग्राम पोस्ट पाहिली. त्यात ज्योतिष-तांत्रिक फक्त 251 रुपये शुल्क घेऊन वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि करिअरबद्दल माहिती देण्याचा दावा करत होता.

महिलेकडून 53 व्यवहारांमध्ये तीन लाख 47 हजार रुपये उकळले

प्रेमसंबंधांमुळे चिंतेत असलेल्या महिलेने त्याला संपर्क करून प्रियकराबद्दलची माहिती विचारण्यासाठी 251 रुपयांचे शुल्क भरले. तिची व प्रियकराबाबत माहिती संबंधीत तांत्रिकाला दिली. त्याने त्या माहितीद्वारे तिच्या प्रियकरावर दुसऱ्या मुलीने जादूटोणा केला आहे. पण तिचा प्रियकर तुझ्यावरच (तक्रारदार महिलेवर) प्रेम करतो. पण काळ्याजादूमुळे तो तिच्यापासून दूर होत चाललाय, असा दावा केला. विविध विधीच्या नावाखाली या तांत्रिकाने तक्रारदार महिलेकडून 53 व्यवहारांमध्ये तीन लाख 47 हजार रुपये उकळले. कालांतराने तांत्रिकाने आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.

IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. याच क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या 5 लोकांना अकोल्यातल्या आकोट पोलिसांनी ताब्यात घेतले.16 मोबाईल, 3 लॅपटॉपसह एकत्रित 4 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अकोट शहरातल्या गुरुकुंज कॉलनी येथील एका घरात हा आयपीएलवर सट्टा खेळला जात होता. आज सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर घरझडती घेत छापेमारी केली.. घरातील एका खोलीमध्ये 2 व्यक्ती लॅपटॉपवर आणि 3 व्यक्ती मोबाईलवर सट्टा लावताना दिसून आले. पवन नागापुरे, आयुष वाटाणे, चेतन ढोणे, प्रज्वल कडवे आणि स्वप्निल कुथे या पाच लोकांना ताब्यात घेतलंये.. आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन लिंकवर कस्टमरचे आयडी बनवून क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळतांना मिळून आले.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/UiLOxgs Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम?

source https://marathi.abplive.com/crime/mumbai-crime-news-woman-cheated-by-saying-she-had-cast-black-magic-on-her-lover-tantric-practitioner-embezzled-lakhs-of-rupees-under-the-guise-of-various-rituals-maharashtra-marathi-news-1352103
0 Comments