<p>राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद गाजत आहे. या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महल आणि हंसापुरी भागात दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय घडणार, याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज शाब्दिक वाद, हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-22nd-march-2025-nagpur-riots-maharashtra-budget-session-aurangzeb-tomb-controversy-1350352
0 Comments