Maharashtra Weather Update : राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढणं चालू आहे. त्याच्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी काढणं चालू होईल. दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आलेली पिके काढून घ्यावी. द्राक्ष बागायतदारांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. कारण राज्यात 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची (Maharashtra Weather) शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी वर्तवला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यात मुंबई आणि पुणेला देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज ही पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सर्व भागामध्ये दररोज एक-एक, दोन-दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. तसेच कोकणपट्टी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचे ही डख यांनी सांगितलंय.

द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. परिणामी ज्या शेतकऱ्याला द्राक्ष रॅकवर टाकायचा असेल तर ते 5 एप्रिलनंतर टाकण्याचा सल्ला देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. कारण द्राक्ष पट्ट्यात खूप पाऊस पडणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या टरबूज, खरबूज असेल त्यांनी ही काळजी घ्यावी. सुरतपासून कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार असल्याचे ही ते म्हणाले.

मुंबई पुण्यातही पाऊसची शक्यता

अंदाजानुसार सगळ्यात जास्त पाऊस कोकणात असणार आहे. कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. सात दिवस दररोज आज या भागात तर उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मुंबई आणि पुणेला देखील पाऊस पडणार आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

दरम्यान भंडाऱ्यात आगामी दिवसात यावर्षीच्या सर्वाधिक 41 अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. भंडारा जिल्ह्यात आज दिवसभर आकाश नीरभ्र राहणार असून तापमानात वाढ होणार असल्यानं नागरिकांनी महत्वाचं काम असल्यासचं घराबाहेर पडावं, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

उष्माघातपासून बचाव करण्यासाठी या कराव्यात उपाययोजना

🔸महत्वाचे नसल्यास शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात निघणे टाळावे.
🔸उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडानं झाकूनचं बाहेर निघावं.
🔸चहा, कॉफ़ी व कॅफीनयुक्त शितपेय घेणे टाळावं.
🔸मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
🔸तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
🔸जनवारांना सावलीत ठेवावं व वेळोवेळी पाणी द्यावं.
🔸उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ 108 वर संपर्क करावं.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/6Llo5FE Padwa : विकासाची महागुढी उभारू या, राष्ट्रधर्म वाढवू या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-update-meteorologist-panjabrao-dakh-has-predicted-that-there-is-a-possibility-of-unseasonal-rains-in-the-state-from-april-1-to-april-7-marathi-news-1351735
0 Comments