Majha Gaon Majha Jilha at 7.30AM 06 March 2025 माझं गाव, माझा जिल्हा

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं.आमचा औरंगजेब सुतार वाडीत, तटकरेंवर विखारी टीका.गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, थोरवेंची टीका.

ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. 13 तारखेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कदम यांचा होणार पक्षप्रवेश.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारतर्फे सभागृहात उत्तर, सोमनाथ सूर्यवंशींचा हिस्टोपॅथेलॉजिचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी, रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहात उत्तर.

पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी, तर मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात, एफआयआरमध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा.

संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत शनिवारी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय तसेच शनिवारी दुपारी बारापर्यंत बारामती बंद ठेवण्याचेही आवाहन

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-at-7-30am-06-march-2025-abu-azmi-suspended-marathi-news-abp-majha-1347692
0 Comments