Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 6 AM : 04 March 2025 : ABP Majha
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा होण्याची शक्यता. देवगिरीवर अजित पवार, फडणवीसांची झाली महत्वाची बैठक. बैठकीला अजित पवार धनजंय मुंडे आणि सुनिल तटकरेंची उपस्थिती.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर, संतोष देशमुखांवर अत्याचार करताना मारेकऱ्यांनी गाठली क्रौर्याची परिसीमा, अत्याचार करणारे क्रूरकर्मा मारेकरीही कॅमेऱ्यात कैद.
संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी १५ व्हिडीओ आणि ८ फोटो काढले, आरोपी महेश केदारच्या फोनमधून सीआयडीकडून सर्व फोटो, व्हिडीओ जप्त, व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपींकडून देशमुखांना मारहाण.
सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना अश्रु अनावर, हे अत्यंत वेदनादायी, असं कुणाच्याही बाबतीत होऊ नये, देशमुखांची प्रतिक्रिया.
परळीतलं राष्ट्रवादीचं ऑफिस हे आरोपींचं ऑफीस, हे सगळं पूर्वनियोजित, यात पोलिसांचाही सहभाग, देशमुख कुटुंबीयांकडून आरोप.
संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ धनंजय मुंडेंचा खास माणूस वाल्मिक कराड पाहत होता, जितेंद्र आव्हाडांचा मुंडेंवर हल्लाबोल.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-top-100-headlines-6-am-04-march-2025-santosh-deshmukh-photos-devendra-fadnavis-ajit-pawar-meeting-dhananjay-munde-abp-majha-1347299
0 Comments