Vasai Fire Accident : वसईत मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग; 25 झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे उघड्यावर

Vasai Fire Accident: वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे  25 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने, होळी सणानिमित्त बहुतांश मजूर आपल्या गावी गेल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत मजुरांच्या झोपडीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. ही दुर्घटना काल (15 मार्च) रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

होतं नव्हतं ते सारं जळालं, अनेक कुटुंबे उघड्यावर

या झोपडपट्टीत राहणारे बहुतांश मजूर पालघर जिल्ह्यातील गावपाड्यांचे रहिवासी आहेत. या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या झोपडीधारक मजुरांना तातडीने मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून केली जात आहे.

भरधाव कारणे घेतला अचानक पेट

समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारणे अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाहीये. या घटने बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या भरधाव कारला शनिवार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच गाडीतील प्रवासी हे तात्काळ खाली उतरले. यामुळे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र गाडी जळून खाक झाली आहे.

91 झोपडपट्टीधारकांना मिळाले हक्काचे पक्के घर

बोरिवलीतील महात्मा फुले नगर येथील 91 झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळाले असून, त्यामुळे त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत. उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये, तसेच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले.

बोरिवली पश्चिमेकडील पालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयात महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते.

अनधिकृत झोपड्या आणि फेरीवाल्यांवर कारवाईचा इशारा

"उत्तर मुंबईत नवीन झोपड्या उभ्या राहणार नाहीत. अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. ग्रीनरी आणि सार्वजनिक सौंदर्यस्थळे नीट राखा. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवा आणि बागांमध्ये गैरवर्तन होणार नाही, याची जबाबदारी घ्या. अधिकृत फेरीवाल्यांना संधी द्या, मात्र अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा," असेही निर्देश गोयल यांनी दिले.

हे ही वाचा

पनवेल हादरले! बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली, इको चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

source https://marathi.abplive.com/crime/vasai-fire-accident-massive-fire-breaks-out-in-laborers-slum-in-vasai-25-huts-burnt-down-many-families-left-in-the-open-maharashtra-marathi-news-1349429

Post a Comment

0 Comments