राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ, ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया, एकत्र आले तर कोणाचं पोट दुखतंय, अजित पवारांची मिश्किली

ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरच्या पोस्टची चर्चा...राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हस्तांदोलनाचा फोटो...

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या साद प्रतिसादावर मनसेतून विपरित प्रतिक्रिया, अशी अभद्र युती होऊ नये, अमेय खोपकरांचं ट्वीट, तर महाराष्ट्राच्या नावाखाली स्वतःचं हीत पाहात असाल तर चूक, दरेकरांचा टोला

आम्हाला दोन वेळा वाईट अनुभव आले, मात्र त्यांची इच्छा असेल तर नक्कीच हात पुढे करु, मनसे नेता अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया.

केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, त्यातच महाराष्ट्राचं हित, रोहित पवारांची भावना...कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी सुवर्णक्षण असल्याची प्रतिक्रिया...

मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल...घैसास दोषी असल्याचा ससून हॉस्पिटलचा अहवाल...वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका...

नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार, नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-07-am-20-april-2024-maharashtra-news-raj-thackeray-uddhav-thackeray-shiv-sena-ubt-mns-1355244
0 Comments