<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा देण्यात आली आहे. तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भूमिका जाहीर केली. तसेच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे, असं सूचक वक्तव्य दिल्लीतील युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींनी केलं. तसेच आज अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात रेलचेल सुरु आहे. सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह असून सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारे उघडी आहेत, असं विधान शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. यासह महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-30th-april-2025-pahalgam-terror-attack-kashmir-india-pakistan-akshay-tritiya-today-gold-rate-weather-monsoon-ipl-2025-maharashtra-politics-marathi-news-1356853
0 Comments