Maharashtra Live Updates: बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात तिघांना अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

<p>Maharashtra Live Blog Updates:&nbsp;सातारा शहरातील १८ व्या जयभीम फेस्टिवल ला खा. उदयनराजे भोसले यांची उपस्थिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी लिहित असताना छ. शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या लेटर पॅड वरती लिहून सुरुवात करायचे : खासदार उदयनराजे भोसले</p> <p>&nbsp;महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित साताऱ्यातील गांधी मैदानावर तीन दिवसीय जय भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला खा. &nbsp;उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी आपल्या देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण असल्याचे सांगत त्याच्या जवळपास देखील कुठल्या देशाचा संविधान येऊ शकत नाही, या संविधानात एवढे बारकावे आहेत की कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवर, कुठल्याही महिलेवर, कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता काम नये. याची काळजी त्यांनी घेतली आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी लिखाण करताना छ.शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या लेटर पॅड वरती लिहून सुरुवात करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आधुनिक जगामध्ये पोहोचण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असे वक्तव्य यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी केले.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-14th-march-2025-todays-breaking-news-in-marathi-babasaheb-ambedkar-jayanti-2025-maharashtra-weather-mi-vs-dc-ipl-2025-donald-trump-tariff-policy-1354222

Post a Comment

0 Comments