Maharashtra Live Updates: देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर, विकासकामांचे उद्घान करणार

<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. &nbsp;सकाळी 10.20 वाजता मुंबईहून अमरावती विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान निधी वाटपाचा शुभारंभ करतील. दुपारी 2.20 वाजता आमदार राजेश वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील.<br />&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;दुपारी 2.45 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे भूमिपूजन करतील. दुपारी 3.20 वाजता मौजा बडनेरा, कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती, वाहने तसेच शहर पोलीस दलाच्या वातानुकूलित वाहतूक कक्ष, महिला विसावा कक्ष व वाहनांचे लोकार्पण करतील. &nbsp;दुपारी 4.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-16th-march-2025-todays-breaking-news-in-marathi-maharashtra-politics-maharashtra-weather-imd-monsoon-2025-1354567

Post a Comment

0 Comments