India Pakistan War :  दिल्लीला शत्रूचा धोका, नागपूरला पर्यायी राजधानी घोषित करा; भारत-पाक युद्धानंतर काँग्रेस नेत्याची मोठी मागणी

India Pakistan War : राजधानी दिल्लीला असलेला संभ्याव्य घोका लक्षात घेता, आपत्कालीन पर्यायी म्हणून राज्याची उपराजधानी नागपूरचा विचार देशाची  राजधानी म्हणून करावा, अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी केली आहे. या संदर्भात मी लोकसभेत अनेक वेळा ही मागणी केलीय, “आज भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीतंही माझी हिच मागणी आहे असे ही ते म्हणाले. ते नागपूर येथे बोलत होते.

सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करा- विलास मुत्तेमवार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे. परंतु, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा एकदा हल्ला (ceasefire violation) करण्यात आला होता. यानंतर भारतीय सैन्यालाही (Indian Army) पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. परिणामी हा वाद आता अधिक टोकाला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती बघता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच आता माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करण्याची मागणी केली आहे.

मागणीनंतर एक महिन्यातच संसदेवर हल्ला झाला- विलास मुत्तेमवार

2001 आणि 2013 मध्ये मी संसदेत ही मागणी केली आणि नंतर एक महिन्यातच संसदेवर हल्ला झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ही मागणी करत आम्ही सांगितलं होतं. अशातच देशाच्या मध्यस्थानी असेलेल नागपूर संभाव्य परिस्थिती बघता आणि आपत्कालीन पर्यायी म्हणून देशाची राजधानी करावी अशी मागणी विलास मुत्तेमवार यांनी केली आहे.

भाजपाच्या तिरंगा यात्रेला तूर्तास स्थगित

आपल्या वीर जवानांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशभक्तीचा संदेश देणारी तिरंगा यात्रा आज नागपुरात (रविवार, 11 मे रोजी) सकाळी 8 वाजता निघणार होती. लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान ही यात्रा होणार होती. मात्र, ही यात्रा काही कारणास्तव तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

पाकड्यांची पुरती जिरली, भारतीय सैन्यापुढं काहीही चाललं नाही! अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

source https://marathi.abplive.com/news/india/india-pakistan-war-delhi-is-under-threat-from-enemies-declare-nagpur-as-an-alternative-capital-congress-leader-vilas-muttemwar-demand-after-indo-pak-war-1358557

Post a Comment

0 Comments