<p class="abp-article-slug"><strong>Maharashtra Rain Today: राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Maharashtra Rain Upadates) हजेरी लावली असून मुंबई (Mumbai Rain) आणि पुण्याला (Pune Rain) चांगलेच झोडले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. <a title="पुणे" href="https://ift.tt/kGhSJME" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> शहर आणि उपनगरामध्ये मंगळवारी संध्याकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासलासह अनेक भागात अधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्याने विविध अपडेट्स देखील समोर येताय. या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-maharashtra-rain-updates-mumbai-pune-konkan-rain-today-jyoti-malhotra-india-vs-pakistan-maharashtra-politics-1360131
0 Comments