<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: </strong>जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र पर्यटकांचा जीव घेणारे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. तसेच गद्दार हेर ज्योती मल्होत्राला आज हिस्सार जिल्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योतीवर आरोप आहे. तसेच राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणेसह कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी विविध अपडेट्स येत आहे. या महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-22th-may-2025-maharashtra-rain-updates-mumbai-pune-konkan-rain-today-jyoti-malhotra-pahalgam-terror-attack-maharashtra-politics-1360293
0 Comments