Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील घडामोडींसोबतच राज्यातील मान्सून, क्रीडा, मनोरंजनविषय घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जाईल...

वैष्णवी हगवणे प्रकरणात आज न्यायालयात (Court) जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. आरोपी हगवणे कुटुंबातील पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता, पुणे (Pune) न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे. मात्र, न्यायालयात आरोपींच्या वकिलाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर, आता हगवणेंचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी, आम्ही वैष्णवीचं (Vaishnavi hagawane) कुठलंही चारित्र्यहनन केलेलं नाही. केवळ सत्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली, असे दुषिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी वकिलांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यामध्ये, वैष्णवीचे ज्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होते त्या व्यक्तीचा 19 मे रोजी साखरपुडा झाला असून न्यायालयात आम्ही ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटले.

राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची भर

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 383 वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनामुळे कुणाचाही मृ्त्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-today-29th-may-2025-vishanavi-hagawane-case-pune-crime-monsoon-updates-mumbai-rains-1361408
0 Comments