अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे टोकाचं पाऊल; चक्क भाजप आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात संतप्त शेतकाऱ्याने चक्क भाजपा आमदार संजय कुटे (BJP MLA Sanjay Kute) यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय. अतिवृष्टीमुळे शेतीच झालेलं नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने हे  टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आरोपी विशाल मुरुख सोनाळा पोलीसात गुन्हा दाखल केला असून शेतकरी आता पोलिसांच्या अटकेत आहे. तर मुरुख याच्यावर सोनाळा पोलीस स्थानकात लोकप्रतिनिधींना समाज माध्यमात धमकी देऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा दुसरा गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र या एकंदरीत प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

"तृप्ती व्हिला" हे जाळून टाकण्याची धमकी

पुढे आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावातील शेतकरी विशाल सुधाकर मुरुख यांच्या शेतात 2024 साली अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं. त्यांनी वेळोवेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात कागदपत्रे ही जमा केली होती. त्यांचं बँक अकाउंट केवायसी ही केलं होतं. मात्र तरीही शेतीचे नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्याने या संतप्त शेतकऱ्यांने जळगाव जामोद चे भाजपा आ. संजय कुटे यांना आधी समाज माध्यमात त्यांच जळगाव जामोद येथील निवासस्थान "तृप्ती व्हिला" हे जाळून टाकण्याची धमकी दिली होती.

यालाच अनुसरून या शेतकऱ्याने काल रात्री संजय कुटे यांच्या निवासस्थानी जाऊन निवासस्थानात प्रवेश मिळवून संजय कुटे यांचे निवासस्थान जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समयसुचकता दाखवत संजय कुटे यांच्या स्वीय सहायकाने या शेतकऱ्याला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, शेतकरी अटकेत

याप्रकरणी संजय कुटे यांच्या स्वीयसहायकाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव जामोद पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख याच्यावर बी एन एस 333 , 351(2) नुसार गुन्हा दाखल करत या शेतकऱ्याला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासह लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पन्नास रूपयाचा वादातून मारहाणीत 32 वर्षीय युवकाचा मृत्यू

50 रुपये उधारी देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदीभागातील कोरटा या आदिवासी बहुल गावात घडली. दत्ता चिंतामण बरगे असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी दराटी पोलिसांनी तिघांना अटक केली. उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील दत्ता बरगे या युवकाचा मित्र असलेल्या माधव तोरकड याच्यासोबत 50 रुपयाच्या देण्या घेण्यावरून वाद झाला होता. वाद होत असतांना त्याचा काका श्रीराम तोरकड याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर गोदाजी तोरकड यांनी मुलांना 50 रुपयासाठी का भांडण करता म्हणून खडसावले. त्यामूळे दत्ता बरगे याने गोदाजी यांना शिविगाळ केल्याने त्याच्या मुलाने त्याला ढकलले. त्यामूळे दत्ता हा डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. दरम्यान घरी गेल्यावर त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होवू लागल्याने कुटूंबीयांना त्याला रूग्णालयात घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांची कन्या वैभवी NEET परीक्षेत उत्तीर्ण, सुप्रिया सुळेंनी फोन करुन केलं कौतुक, किती मिळाले गुण?

source https://marathi.abplive.com/crime/buldhana-news-farmers-attempt-to-set-fire-to-bjp-mla-sanjay-kute-residence-angry-over-not-receiving-compensation-for-damage-to-agriculture-due-to-heavy-rains-1364299

Post a Comment

0 Comments