Maharashtra Breaking Live Updates: या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला जातो... तुम्हाला सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर मिळतील...

मुंब्रा मुंबई लोकल अपघात

मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ काल भीषण दुर्घटना घडली. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या दोन लोकलमधले 13 प्रवासी खाली पडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अख्खी मुंबई हादरुन गेली.

ठाकरे बंधूंचं मनोमिलन?

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांआधी जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीही समोर आली. याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मनसेच्या युतीबाबत प्रश्न विचारला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-11th-june-2025-shivsena-ubt-mns-yuti-uddhav-thackeray-raj-thackeray-mumbra-mumbai-local-accident-weather-update-municipal-elections-1363595
0 Comments