भंडारा: 'जे अंगावर येथील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र शांत राहणार नाही' असा गर्भित इशारा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी भाजप आमदार परीणय फुके (Parinay Fuke) यांना त्यांचं नावं नं घेता दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भंडारा येथे आभार सभेला आले असताना त्यांच्या उपस्थितीत भोंडेकरांनी हा इशारा सत्ताधारी भाजप पक्षातील आमदाराला दिलाय. भाजपाने निष्कषित केलेल्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्येचं पक्ष वाढीवरून आता भंडाऱ्यात शाब्दिक वॉर सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे.

सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्येचं पक्ष वाढीवरून शाब्दिक वॉर

भंडाऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा पार पडली. या सभेत भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप आमदार परीणय फुके यांचं नावं नं घेता त्यांच्यावर सडकून टीका करताना त्यांना इशाराही दिलाय. शिवसेना भंडारा जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष असून आता पक्ष मोठा होत असल्यानं दुसऱ्या पक्षातील विरोधक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार भोंडेकरांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या नियुक्तीबाबत शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही सहमती दर्शविली आहे. मात्र, विरोधी पक्षाचे नेते आमच्यावर टीकाटिप्पणी केली तर चालेल. पण, आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर टीका टिप्पणी करीत आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार भोंडेकरांनी दिलाय. यासोबतच त्यांना मंत्रिपद दिलं नसल्याचीही खंत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर भाषण करताना आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, आणि त्यामुळेच भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुके यांच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली आहे.

सराईत गुंडाचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

दुसरीकडे नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरने काल (28 जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्यामुळे त्याचे काही वर्ष तुरुंगातही गेले असून अनेक प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती आहे. मात्र, नागपुरात आज ही लोकं त्याला एक सराईत गुंड म्हणून ओळखतात आणि त्याच युवराज माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/6PhniNI Crime : आधी कारने उडवलं, नंतर सपासप वार करुन संपवल; अमरावतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्ष हत्या प्रकरणातील आरोपीला बेड्या

source https://marathi.abplive.com/news/narendra-bhondekar-on-parinay-fuke-controversy-over-raise-the-party-bjp-vs-shivsena-in-bhandara-shiv-sena-mla-directly-attacks-bjp-in-front-of-eknath-shinde-maharashtra-politics-1366814
0 Comments