Maharashtra Rain Live: इंद्रायणी नदी पूल तुटून लोक वाहून गेले, सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरुवात

<p>पुणे जिल्ह्यातील मावळमधील कुंडमळा इथं पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं, ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे. पण मध्यरात्रीपासून पावसाचा ठिपका थांबायचं नाव घेईना, याचा व्यत्यय आजच्या बचावकार्यात होणार आहे. हे आव्हान बचाव पथकं कसं, पेलतात हे पाहणं महत्वाचं आहे. या मोहीमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या मुंबईतही जोरदार पाऊस आहे. रविवारी रात्रभर मुंबईत पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत आज रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची परिस्थिती काय असणार, हे बघावे लागेल. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.&nbsp; (Maharashtra Live Updates)</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-breaking-news-16-june-2025-pune-rain-indrayani-river-bridge-collapse-mumbai-rains-weather-updates-iran-israel-war-news-1364466

Post a Comment

0 Comments