Mumbai Crime News: गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबेर बाईक चालकाकडून शिवीगाळ अन् मारहाण; पोलिसांनी वीस मिनिटात केली अटक
Mumbai News: मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे उबर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला भलतेच अडचणीचे ठरले. बाईक चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवर ड्रॉप केल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण (Mumbai Crime News) केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सुरू असतानाच त्या ठिकाणी सतर्क भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले.
मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक फरार झाला. याप्रकरणी तरुणीने वनराई पोलीस ठाण्यात उबर टॅक्सी बाईक चालकाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी उबर टॅक्सी बाईक चालकाला अवघ्या वीस मिनिटात अटक केली आहे. मात्र अशा उबर टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच उबेर, ओला,  झेप्टो आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी कामावर ठेवले पाहिजे, असे मत गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी वनराई पोलिसांकडे व्यक्त केले आहे.
'त्या' विद्यार्थिनीला दिलासा, न्यायालयाच्या निर्णयानंतर बडतर्फचे आदेश मागे
विद्यार्थिनी अटकेच्या कारणास्तव प्रात्यक्षिकासह दोन विषयांच्या परीक्षेला मुकली होती. परीक्षेला बसता यावे यासाठी विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे निवेदन सादर केले असून तिच्या निवेदनावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. मूळची जम्मू काश्मीरची रहिवासी असलेली ऑपरेशन सिंदूरविरोधात सोशल मीडियावर आलेली प्रतिक्रिया या विद्यार्थिनीने पुन्हा प्रसिद्ध करूननंतर ती माफी मागून हटवली होती. त्यानंतरही पोलिसांनी अटकेची, तर महाविद्यालयाने बडतर्फीची कारवाई केली.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खडंपीठाने सरकार आणि महाविद्यालयाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून या विद्यार्थिनीच्या सुटकेचे आदेश दिले होते. याचिकाकर्तीच्या बडतर्फीचा आदेश तुम्ही मागे घेणार की, आम्ही तो रद्द करू, अशी विचारणाही केली. त्यावर, न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी भूमिका महाविद्यालयाने मांडली. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्तीला बडतर्फ करण्याचा निर्णय रद्द केला.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/Xj72Em1 : प्रेमभंगाची वेदना, तरुणाचा प्रेयसीच्या चितेवर उडी मारण्याचा प्रयत्न; उपस्थितांनी रग्गड हाणला, जखमी तरुण आता मरणाच्या दारात
source https://marathi.abplive.com/news/mumbai-crime-news-uber-bike-driver-abuses-and-beats-up-female-passenger-in-goregaon-vanrai-police-arrest-accused-within-20-minutes-1363419
Post a Comment
0 Comments