Raj Thackeray: अहमदाबाद विमान अपघातानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत, बोईंग विमानाबाबत धक्कादायक माहिती, पुरावे देत सगळंच बाहेर काढलं!

मुंबई : अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं फ्लाइट एआय 171 कोसळलं. या विमान दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर 12 क्रू मेंबर्संनाही आपला जीव गमवावा लागलाय. अहमदाबादच्या  सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला जात असलेलं प्रवासी विमान (passenger aircraft) मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात  कोसळलं  आहे. एअर इंडियाचं (Air India) एआय 171 (AI171) हे विमान होतं.दरम्यान या अहमदाबाद विमान अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. बोईंगच्या ड्रीमलाईनरबद्दल अनेक तक्रारी होत्या. असे असतांना डीजीसीएने कारवाई का नाही केली? असा परखड सवाल करत राज ठाकरेंनी बोईंगच्या ड्रीमलाईनरच्या विमानसेवेबाबत अनेक पुरावा देत सवाल उपस्थित केले आहे.

राज ठाकरेंची पोस्ट नेमकी काय?

अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी 2013  ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे 2013 ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं.
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? असा परखड सवाल  राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर..

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली, ती म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं.
ड्रीमलाईनरची सेवा 2020 ते 2023  च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली.आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला?  ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी. असेही राज ठाकरे म्हणाले.

मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा.
https://ift.tt/284ZzPT />https://ift.tt/9oCj1Y5 />https://ift.tt/6vfObXh />https://www.youtube.com/watch?v=rvkEpstd9os
https://ift.tt/p6m0iQW />न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खालील शब्द टाकलेत तर तुम्हाला संपूर्ण आर्टिकल वाचता येईल.
https://ift.tt/on9Fba8 />Report on Boeing 787 Dreamliner Batteries Assigns Some Blame for Flaws” by Jad Mouawad (published December 1, 2014)
वॉलस्ट्रीट जर्नलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर हे शब्द टाकलेत तर तुम्हाला याबद्दल पूर्ण वाचता येईल.
https://ift.tt/ZUrfoDj />Production Problems Spur Broad FAA Review of Boeing Dreamliner Lapses WSJ

source https://marathi.abplive.com/news/raj-thackeray-reaction-on-air-india-plane-crash-in-ahmedabad-criticized-on-dgca-over-dreamliner-provided-evidence-and-cleared-everything-ahmedabad-air-india-plane-crash-1363948

Post a Comment

0 Comments