Buldhana Crime : गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; नग्न करत व्हिडिओ केला शूट, बुलढाण्याच्या खामगाव शहरात खळबळ!

Buldhana Crime News बुलढाणा: खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून रात्री एका 24 वर्षीय तरुणाचं अपहरण करून सुरुवातीला त्याला जवळच असलेल्या मैदानात नेऊन त्याचा धर्म व जात विचारत जबर मारहान करण्यात आलीय. इतकंच नाही तर या तरुणाचा धर्म तपासण्यासाठी त्याला चक्क नग्न करत मैदानात असलेल्या गायींसोबत त्याचे नग्न व्हिडिओ व फोटो देखील काढण्यात आले आहे.  यानंतर पुन्हा त्या तरुणाला तीन किमी अंतरावर नेन्यात आले. तिकडेही या तरुणाला नग्न करत मारहाण करण्यात आली.

दरम्यान, नशिबाने गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्याने या तरुणाचा जीव वाचलाय. ही धक्कादायक घटना तीन पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव (Khamgaon) शहरात घडली आहे. या मारहाणीत या तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाच हाड ही मोडल आहे. सध्या या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोहन पैठणकर अस या तरुणाच नाव असून तो एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतो आणि आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतो.

त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा, अन्यथा राज्यात परिणाम वाईट होतील

दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन तरुणांना अटक केली आहे. मात्र तिसरा अद्यापही फरार आहे. याप्रकरणी आता काही संघटना आक्रमक झाल्या असून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार खामगाव येथे येऊन त्या तरुणाची भेट घेणार आहेत. तरुणाला तुझा धर्म कोणता? तू गाय चोर, असे  म्हणत मारहाण केली. त्याचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न केलं. रोहन पैठणकरवर जीवघेणा हल्ला करणारे आतंकी आहेत. त्यांनी धर्म विचारून मारलं आहे. आरोपीवर मोक्का लावा, आरोपीवर कठोर कार्यवाही करावी. त्यांचे घरं बुलडोझर चालवा, अन्यथा राज्यात परिणाम वाईट होतील. जनावराच्या नावावर माणसांना मारणाऱ्या या प्रवृत्तीला आता ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी दिला आहे.

मात्र, या घटनेने तीन पोलीस स्टेशन एक पोलीस उपअधीक्षक कार्यालय व एक अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/t7IyWKd Vijay Diwas : कारगिल युद्धात कोणत्या राज्याचे सर्वाधिक जवान शहीद झालेले?  ऑपरेशन विजय किती दिवस सुरु होतं?

source https://marathi.abplive.com/crime/buldhana-crime-news-young-man-brutally-beaten-on-suspicion-of-cow-theft-video-shoting-in-khamgaon-town-of-buldhana-marathi-news-1372584

Post a Comment

0 Comments