<p><strong>Maharashtra Breaking News: अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावलंय. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः जे आयातशुल्क लावतो, ते जगातील सर्वाधिक शुुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च तेल आयात करतो, एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो, हे सगळं अजिबात ठीक नाही.. त्यामुळे भारत आता २५ टक्के आयातशुल्क भरणार, आणि त्याव्यतिरिक्त दंडही आकारला जाणार, आणि हे वाढीव शुल्क १ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. तसेच आज बहुप्रतिक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-malegaon-blast-case-verdict-donald-trump-tariff-on-india-narendra-modi-stock-market-maharashtra-rains-politics-1373724
0 Comments