<p><strong>Maharashtra Live blog updates:</strong> मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात. सोमवारी रात्री हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळती सुरु झाली. एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने ही वायूगळती तात्पुरती थांबवली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-29-july-2025-pune-rave-party-eknath-khadse-rain-weather-updates-in-marathi-1373284
0 Comments