<p><strong>Maharashtra Live Blog Updates: लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष <a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/suraj-chavan-viral-video-ncp-youth-president-beaten-chhava-sanghatana-workers-on-manikrao-kokate-rummi-video-clip-marathi-news-1371206">सूरज चव्हाण</a> (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-live-blog-updates-breaking-news-21-july-2025-ncp-suraj-chavan-sunil-tatkare-chava-sanghatana-vijaykumar-ghadge-latur-band-manikrao-kokate-rummy-weather-updates-rains-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-maharashtra-politics-1371259
0 Comments