Urfi Javed Lip Fillers Dissolved | उर्फीचा चेहरा सुजला, ओळखणंही कठीण! उर्फीच्या चेहऱ्याला नेमकं काय झालं?

उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी फॅशनमुळे (Fashion) नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या कपड्यांमुळे नाही, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. बोल्ड (Bold) दिसणाऱ्या उर्फीचा (Urfi) सध्याचा चेहरा पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे. उर्फीचे (Urfi) ओठ सुजलेले आणि तोंड लालबुंद दिसत आहे. सुंदर दिसण्यासाठी केलेल्या एका सर्जरीमुळे (Surgery) हे घडले आहे. उर्फीने (Urfi) नऊ वर्षांपूर्वी लिप फिलर्स (Lip Fillers) केले होते. आता तिने ते लिप फिलर्स (Lip Fillers) काढण्याचा निर्णय घेतला. "चुकीच्या ठिकाणी हे लिप फिलर्स (Lip Fillers) लावल्याचं म्हणत तिनं ते काढण्याचा निर्णय घेतला." असे तिने म्हटले आहे. हे ट्रीटमेंट (Treatment) करतानाचा एक व्हिडिओ (Video) उर्फीने (Urfi) शूट (Shoot) करून इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट (Post) केला आहे. व्हिडिओत (Video) उर्फी (Urfi) ओठांवर (Lips) इंजेक्शन्स (Injections) घेताना दिसत आहे. इंजेक्शन्समुळे (Injections) तिचा चेहरा अधिकच सुजल्याचे दिसत आहे. लिप फिलर (Lip Filler) म्हणजे ओठ (Lips) अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेलसारखा (Gel) पदार्थ इंजेक्ट (Inject) करणे. यापूर्वी सुश्मिता सेन (Sushmita Sen), अनन्या पांडे (Ananya Pandey), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), मिनिषा लांबा (Minissha Laamba), कतरीना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या अनेक बॉलिवूड (Bollywood) कलाकारांनी (Actors) अशी ट्रीटमेंट (Treatment) केली आहे. सिनेकलाकारांसाठी (Film Artists) प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) नवीन नाही. उर्फी (Urfi) सौंदर्य वाढवायला गेली होती, पण तोंड सुजवून परत आली.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-urfi-javed-s-lip-fillers-dissolved-actress-shares-swollen-face-video-after-cosmetic-surgery-sparks-bollywood-beauty-debate-1371503

Post a Comment

0 Comments