Vasia Road Accident: वसई रोड येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा सात वर्षांचा नातू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वसईच्या सनसिटी रोडजवळ (Vasai Suncity Road) घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात करणारा दुचाकीस्वार मद्यधुंद (Drink & Drive case) अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत खाखम (वय ६०) असून ते वसईचे रहिवासी होते. त्यांनी नुकतीच पंढरपूर यात्रा पूर्ण करून मुंबईला परत आल्यानंतर आपल्या नातवाला भेटण्यासाठी वसई गाठले होते. बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांनी आपल्या नातवाला, ध्रुव सिंह (वय ७) बागेत नेण्यासाठी दुचाकीने बाहेर काढले. ते दोघे सनसिटी रोडजवळ पोहोचले असताना, एका भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

अपघातात चंद्रकांत खाखम आणि ध्रुव दोघेही रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्याचवेळी धडक देणारा दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीही खाली पडून जखमी झाली. सर्व जखमींना तातडीने बालाजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, चंद्रकांत खाखम यांना उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. ध्रुवच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

मृताच्या नातेवाईक नरेंद्र खाखम यांनी सांगितले की, “काका पंढरपूरहून परत आल्यानंतर त्यांनी नातवाला भेटण्यासाठी वेळ काढला होता. ते स्वतः दुचाकी चालवत होते, पण हेल्मेट घातले नव्हते. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.”

या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, दुचाकीस्वाराविरोधात अतिवेगात वाहन चालवून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. चारचाकी गाडीवर कंटेनर पलटी झाल्यान त्याखाली गाडी दबली जाऊन त्यातील दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांचा मृत्यू झला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यान कंटेनर पलटी होऊन चारचाकी गाडीवर जाऊन पडला आणि काही अंतर गाडीला फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळता- घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याच पथक घटना स्थळी दाखल झाले- क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व रहिवासी मुबंईच्या अंधेरी परिसरातील होते. गुरुपौर्णिमा निमित्ताने एका मठात दर्शनासाठी आल्याची माहिती असून काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी: पंढरपूरवरुन परतणाऱ्या भाविकांची एसटी बस बुलढाण्यात पलटी, भीषण अपघात, 30 जण जखमी

बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या, तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर

source https://marathi.abplive.com/news/mumbai/vasai-road-accident-bike-accident-grandfather-died-on-the-spot-grandchild-injured-near-suncity-vasai-1369188
0 Comments