महाविकास आघाडी सरकार आल्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले आहे. पावसाळी अधिवेशन हे जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला मुहूर्त मिळत नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिले अधिवेशन जे पूर्ण काळ चालले ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे अधिवेशन सुरू असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळावे लागले.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-legislature-monsoon-session-may-postponed-due-to-covid-19-793842
0 Comments