<p style="text-align: justify;"><strong>अकोला : </strong> नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा सृजनोत्सव. तिच्या मातृत्वासोबतच तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा सोहळा. कृषी क्षेत्रात अनेक महिलांनी भरीव योगदान देत यशाचे अनेक नवे अध्याय लिहिले आहेत. याच अध्यायातलं एक नाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील भांबेरी गावातील महिला शेतकरी संगिता देशमुख. संगिताताईंनी स्वत:च्या शेतीला गृहउद्योगातून नवी ओळख दिली आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/navratri-2020-special-about-sangita-deshmukh-akola-success-story-820883
0 Comments