प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. \"अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो,\" असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. \"भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो,\" असंही थोरात म्हणाले.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ed-raid-at-pratap-sarnaik-house-balasaheb-thorat-reaction-831207
0 Comments