<p><strong>नांदेड :</strong> सोमवारी हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या हिंसेनंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून जवळपास 400 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.</p> <p>सोमवारी हल्लाबोल कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या घटनेविषयी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज 11 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्याच ठिकाणी ते या घटनेविषयी माध्यमांशी बोलणार आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nanded-sikh-community-attacked-police-with-swords-980091
0 Comments